अॅग्रिस्टॅक. - गुहागर तालुक्यातील सर्व शेतकरी खातेदारांसाठी अॅग्रिस्टॅक योजनेच्या अनुषंगाने महत्त्वाची सूचना
सध्या राज्यात अॅग्रिस्टॅक योजनेच्या अनुषंगाने शेतकरी नोंदणी प्रक्रिया नागरी सुविधा केंद्रावर (CSC) सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनेचे लाभ व माहिती जलगतीने तसेच पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी आधार संलग्न माहितीसंच (फार्मर रजिस्ट्री) तयार करणे हे उद्दीष्ट आहे.
या योजनेचे अपेक्षित फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
1) *पी एम किसान* योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी सुलभता येईल.
2) *पी एम किसान* योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल.
3) पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे घेणे सुलभ होईल.
4) पीक विमा व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण सुलभ होईल
5) किमान आधारभूत किमतीवर खरेदीसाठी नोंदणी सुलभ होईल.
6) सरकारी योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल. योजनेसाठी लाभार्थीची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता भासणार नाही.
7) वेळेवर कृषी विषयक सल्ले, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार व प्रचारास मदत होईल.
8) बाजारपेठेपर्यंत सोयीस्कर प्रवेश मिळेल
*गुहागर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गास विनंती करण्यात येते की त्यांनी आधार कार्ड व आधार संलग्न मोबाईल सोबत घेऊन जवळच्या नागरी सुविधा केंद्रावर (CSC) भेट देऊन नोंदणी करावी.*
Comments
Post a Comment