आज रविवार दि. १९ रोजी आबलोली येथे व्यापारी संघटना आबलोली यांचे वतीने श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 
गुहागर तालुक्यातील आबलोली येथे व्यापारी संघटना आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आज रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी चंद्रकला उद्योग समूह मैदान आबलोली येथे श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सकाळी ०९:०० वाजता श्री. सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली असून सकाळी १०:०० वाजता महाआरती व तिर्थप्रसाद त्यानंतर दुपारी १२:३० ते ०२:०० यावेळेत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर सायंकाळी ०७:०० वाजता आबलोली - खोडदे गावातील स्थानिक मंडळांचे सुस्वर भजन आयोजित करण्यात आले आहे त्यानंतर रात्रौ १०:०० वाजता चिपळूण तालुक्यातील आबिटगाव येथील बहुरंगी बहूढंगी नमन सादर होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील जनतेने मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन व्यापारी संघटना आबलोली या संघटनेचे अध्यक्ष ॠषीकेश बाईत, उपाध्यक्ष विजय पागडे, सेक्रेटरी शैलेश दिंडे, खजिनदार सुनिल दाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments