*चिपळुणातील दोन भीषण अपघातात दोन तरुण ठार*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*चिपळुणातील दोन भीषण अपघातात दोन तरुण ठार*
नववर्षाचा पहिला दिवस उजाडण्याआधीच चिपळूणमध्ये महामार्गावर बुधवारी मध्यरात्री दोन भीषण अपघात झाले. एक दुचाकी महामार्गाच्या दुभाजकावर आदळली आणि त्यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक तरुण 'एमबीबीएस'च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. दुसऱ्या अपघात एसटीने दुचाकीला धडक दिली असून, यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातांनी चिपळूणमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकीकडे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत अशा जल्लोषाचे वातावरण असताना चिपळणच्या महामार्गावर दोन भीषण अपघात झाले. डेरवण हॉस्पिटल येथून साहिल सुर्वे (२२, रा. सावर्डे) आणि उदय किरण अटपालकर (२१, रा. नांदेड) हे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चिपळूणकडे निघाले होते. पल्सर दुचाकी घेऊन दोघेही चिपळूणच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. मात्र महामार्गावर कामथे घाटातील एका अवघड वळणावर दुचाकींचा ताबा सुटला आणि दुचाकी महामार्गावरील दुभाजकावर जोरदार आदळली. यामध्ये दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. तसेच साहिल सुर्वे आणि उदय अटपालकर हे दोघेही जागीच मृत्युमुखी पडले. हा अपघात एवढा भीषण होता की बघणाऱ्याचा थरकाप उडत होता. उदय अटपालकर हा नांदेड येथील आहे. तो डेरवण येथे 'एमबीबीएस'च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. साहिल आणि उदय हे मित्र होते.
दुसऱ्या अपघातात शहरातील पॉवर हाऊस येथे दुचाकीला एसटीची धडक बसली. रात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास सौरभ नरलकर, सिद्धेश काणेकर, शुभम काणेकर दुचाकीवरून पॉवरहाऊस येथून पंजाबी ढाबा या ठिकाणी निघाले होते. कापसाळकडे जात असताना कोल्हापूर रोहा एसटीची त्यांना जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील सौरभ, सिद्धेश आणि शुभम (रा. पेढे, ता. चिपळूण) या तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment