रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद पेटला, गोगावलेंची नाराजी, महाडमध्ये राडा
![]() |
| रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार राडा |
प्रतिनिधी सिताराम कळंबे रायगड - अखेर महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. बीड आणि रायगडच्या पालकमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होते, याला पूर्णविराम लागलाय. बीडमधील परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांना पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळाले नाही. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यात पालकमंत्रिपदावरून संघर्ष चालू होता. यामध्ये आदिती तटकरे यांना झुकते माप देण्यात आलेय. रायगडचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. तर भरत गोगावले यांना कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले नाही,भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न दिल्यामुळे रायगडमध्ये जोरदार राडा झालाय. गोगावले समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तटकरे समर्थकांकडून जल्लोष केला जात असतानाच गोगावले समर्थकांनी मात्र आंदोलन पुकारले. शनिवारी रात्री काही काळासाठी महामार्गही रोखला होता. शिवाय पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे भरत गोगावले यांनाही नाराजी व्यक्त केली आहे.
*भरत गोगावले काय म्हणाले?
रायगडच्या पालकमंत्रिपदावरील निर्णय धक्कादायक आहे, ही अपेक्षा नव्हती, अशी नाराजी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे.
पालकमंत्रिपदाबाबद दिग्गजांसोबत अञ्याप चर्चा झालेली नाही. रायगडमधील सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील वातावरणाबाबत माहिती दिली होती. आत्ताचा निकाल आहे तो अनपेक्षीत आहे.आणि आम्हाला पटणारा नाही, असे गोगावले म्हणाले. परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे गोगावले यांनी सागीतले.
*गोगावले समर्थक रस्त्यावर उतरले ?*
गोगावले यांचा जयजयकार करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराज शिवसैनिकांनी सुमारे दोन तास महामार्ग रोखला होता. महाड MIDC, महाड शहर पोलिसांनी हस्तक्षेप करीत संतप्त शिवसैनिकांना बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. भरत गोगावले यांना पालकमंत्री पदावरून डावलल्याप्रकरणी दक्षिण रायगडमध्ये आज पुन्हा पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


Comments
Post a Comment