रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन सब ज्युनिअर अँड ज्युनिअर चॅम्पियनशिप या स्पर्धेचा आज शिवाजी स्टेडियम येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये शुभारंभ झाला.
स्पर्धेचे उद्घाटन सीनियर बॅडमिंटन प्लेयर आणि आरडीबीए चे माजी अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांच्या हस्ते झाले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन चे अध्यक्ष हिराकांत साळवी यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्ह्यातून विविध भागातून विविध वयोगटातले 100 हून अधिक स्पर्धक उपस्थित होते ही स्पर्धा आज 14 आणि उद्या 15 रोजी खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीओंकार हजारे, सेक्रेटरी रजनीश महागावकर, श्री पराग पानवलकर ,फिरोज गव्हाणकर, श्री अमित मुळे इत्यादी उपस्थित होते.
तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन सेक्रेटरी रोटे. संदीप करे, रोटे. वैभव कानडे ,रोटेरियन दादा कदम ,रोटे. बिपिनचंद्र गांधी , रोटे. निलेश मलुष्टे, रोटे. वामन सावंत, रोटे. विनयजी आंबुलकर, रोटे. शाल्मली आंबुलकर रोटे. स्वप्ना करे आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष रोटे. रुपेशजी पेडणेकर, रोटे. राजेंद्र घाग, रोटे. श्री सुरेन्द्र येरम हे सुद्धा उपस्थित होते. रविवारी 15 तारखेला या स्पर्धेचे अंतिम सामने खेळवले जाऊन सायंकाळी बक्षीस वितरण केले जाईल.
Comments
Post a Comment