*काँग्रेस सरकारच्या काळात उभारण्यात आलेल्या पुलांमुळे ५ गावे एकमेकांना जोडली गेली*
◼️ *दैनिक फ्रेश न्युज* ◼️
*काँग्रेस सरकारच्या काळात उभारण्यात आलेल्या पुलांमुळे ५ गावे एकमेकांना जोडली गेली*
*१९९०-९५ मध्ये धोपेश्र्वर, शिवणे खुर्द, सोगमवाडी येथे तात्कालीन मंत्री भाईसाहेब हातणकरांमुळे झाली भव्य अशा पुलांची उभारणी*
*यामुळे धोपेश्र्वर, पन्हळे, गोवळ, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे ही गावे एकमेकांना जोडली गेली*
सिद्धेश मराठे/रत्नागिरी प्रतिनिधी:-
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजापूर तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून विविध अशी विकास कामे संपन्न झाली. राजापूर तालुक्यातून कोकण रेल्वे जाणे हे सगळ्यात महत्त्वाचे असे विकासाचे काम. राजापूर तालुक्याला पहिल्यांदीच ल.र. तथा भाईसाहेब भातणकर यांना मंत्रिपद मिळाले आणि त्यानंतर राजापूर तालुक्यात विकासाची गंगा सुरू झाली. राजापूर तालुक्यातील धोपेश्वर, शिवणे खुर्द आणि सोगमवाडी या तीन गावात भव्य अशा पुलांची उभारणी झाली आणि त्यामुळे धोपेश्वर, पन्हळे, गोवळ, शिवने खुर्द, देवाचे गोठणे, या गावांसहित आता धाऊलवल्ली, सोलगाव ही गावे सुद्धा जोडली गेली आहेत. त्यावेळी असलेले काँग्रेस नेतृत्वाकडे विकासाचे व्हिजन होते म्हणूनच या पुलांच्या उभारणी सारखी भव्य अशी विकासाची कामे होऊ लागली. आज जवळपास 34 ते 35 वर्षे झाली हे पूल आजही चांगल्या स्थितीत अबाधित आहेत आणि अजूनही आणि यापुढेही या पुलावरून वाहतूक ही सुरूच राहणार आहे.
राजापूर तालुका खरं तर काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. भाईसाहेब हातणकरच राजापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून गेले. त्यानंतर गणपतराव कदम काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेत निवडून गेले. राजापूर ते बुरुंबेवाडी हा कच्चा रस्ता होता. हा कच्चा रस्ता तयार करताना सुद्धा या भागातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचाच मोठा पुढाकार होता. धोपेश्र्वर, शिवणे खुर्द, सोगमवाडी ही गावे एकमेकांना जोडली जावी म्हणून पूल उभारणीचा प्रस्ताव पुढे आहे. १९९० साली भाईसाहेब हातणकरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवणे खुर्द गावातील पुलाचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर १९९१ मध्ये सोगमवाडी पुलाचे उद्घाटन झाले. त्याकाळी शिवणे खुर्द इथे एकमेव माध्यमिक विद्यालय सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोय व्हावी. तसेच या भागातील शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना, मच्छीमारांना, सर्व सामान्य माणसांना सहज राजापूर शहरात जाता यावे यासाठी पुलांची उभारणी करण्यात आली. त्यापूर्वी या भागातील लोक अर्जुना नदीतून होडीने राजापूर पर्यंत जात असत अशी माहिती काही लोक देतात.
विकासाची कामे होतच राहतात. जसजशी प्रगती होत जाते तसतसा मागे झालेल्या कामांचा विसर पडत जातो. आजच्या पिढीला सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आत्ता काय चाललंय तेवढीच माहिती मिळते. आत्ताचे नेते मंडळी काय काय विकासाची कामे करतात आणि काय काय पद्धतीने गाजावाजा करतात एवढेच पाहायला मिळते. पूर्वीचे नेते मंडळी निस्वार्थी मनाने विकासाची कामे करत गेली. कोणताही गाजावाजा न करता. राजापूर ते बुरुंबेवाडी या दरम्यान झालेला रस्ता आणि पूल या कामांची काँग्रेस पक्षाने केलेल्या विकासाची इतिहासाची साक्ष देतात. या भागातील जनता त्यावेळी काँग्रेस पक्षाने केलेली चांगली आणि धोरणात्मक विकासाची कामे विसरलेली नाही. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाहीत.
*https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39*
Comments
Post a Comment