ज्योतिष व वास्तू क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. संजय सुधाकर जोशी यांना “महाराष्ट्र भूषण सन्मान 2026”

ज्योतिष व वास्तू क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. संजय सुधाकर जोशी यांना “महाराष्ट्र भूषण सन्मान 2026”
ज्योतिष, भूजल सर्वेक्षण, रत्नपारखी, हस्तरेषा व वास्तू या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. संजय सुधाकर जोशी यांना “महाराष्ट्र भूषण सन्मान 2026” प्रदान करून गौरविण्यात आले.
आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये डॉ. संजय सुधाकर जोशी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा सन्मान देण्यात आला.
डॉ. जोशी यांनी ज्योतिषशास्त्र, भूजल सर्वेक्षण तसेच वास्तू सल्ला या क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत अनेकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली आहे.
या सन्मानपत्रावर संस्थापक अध्यक्ष मा. गणेश विटकर व सचिव मा. तेजस्विनी दिवटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
डॉ. संजय सुधाकर जोशी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. 🎉

टिप्पण्या