IND vs NZ : - भारताची उडाली दाणादाण; न्यूझीलंडच्या वेगवान त्रिकुटासमोर शरणागती
भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला –
३३ धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पाचपैकी तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यामध्ये विराट कोहली, सर्फराझ खान केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर, रोहित दोन धावा करून बाद झाला आणि यशस्वी १३ धावा करून बाद झाला. सध्या ऋषभ पंत (१५) क्रीजवर आहेत. अशा प्रकार भारताने पहिल्या डावात ३४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या आहेत.
भारताच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद
१९९० नंतर भारताच्या घरच्या कसोटीत संघाने १० पेक्षा कमी धावांसह तीन विकेट गमावण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. भारताची ही अवस्था न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्यांदा झाली आहे. १९९९ मध्ये मोहालीत भारताने ७ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. तर २०१० मध्ये अहमदाबादमध्ये १ धावांवर ३ गडी गमावले होते. आज पुन्हा एकदा भारताने १० धावांच्या आत तीन विकेट्स गमावल्या आहे. १० धावा ही २०१८ नंतरची सर्वात लहान धावसंख्या आहे, ज्यावर भारताने तीन विकेट गमावल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मध्ये भारताने ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध २ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या.
Comments
Post a Comment