१६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कुडली येथे दिवंगत महेंद्र शिवराम जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे आयोजन..!
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे व सर्व सामान्याना बरोबर घेऊन जाणारे तसेच कुडली गावाचा विकास हाच ध्यास घेतलेले गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपूत्र दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव यांचे सुपूत्र दिवंगत महेंद्र शिवराम जाधव यांनीही आपल्या हयातीत वडिलांचे स
वर्ष व वारसा पुढे जोमाने चालवत कुठच्याही अपेक्षा न ठेवता कुडली गावातील जनतेच्या सेवेसाठी लागेल तो गाडी खर्च करून सन २०१९ मध्ये कोरोना काळात आजारी रुग्णांना रत्नागिरी व गुहागर येथे रुग्णालयात ने आण करुन व विद्यार्थ्यांसाठी विवीध शैक्षणिक उपक्रम राबवून समाज सेवेचे व्रत जोपासत एक आगळा वेगळा ठसा उमटवणारे कुडली गावचे सुपूत्र दिवंगत महेंद्र शिवराम जाधव यांचा प्रथम स्मृतीदिन, पुण्यानूमोदन व शोकसभा असा संयुक्त कार्यक्रम बुधवार दिनांक १६ /१०/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता गुहागर तालुक्यातील कुडली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयोजित करण्यात आला असून या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव यांच्या कुटुंबासह भारतीय बुद्ध सासन सभा मुंबई/कुडली तसेच आठ घर भावकी मुंबई/कुडली आणि पंचशिल बुद्ध विहार कमिटी कुडली गाव शाखा यांनी केले असून या संपूर्ण कार्यक्रमाला समाज बंधू - भगीनींनी वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आयु. आवाहन तुकाराम शिवराम जाधव, आयु. आनंद शिवराम जाधव, आयु. चंदन महेंद्र जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment