सांधेदुखीसाठी मोफत वैद्यकीय शिबीर*
*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि ओम फिजिओथेरपी क्लिनिक सांधेदुखीसाठी मोफत वैद्यकीय शिबीर*
जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिनानिमित्त, 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत ओम फिजिओथेरपी क्लिनिक खेडशी रत्नागिरी येथे सांधेदुखीसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात सर्वांची *मोफत बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) चाचणी* केली जाईल, जी ऑस्टिओपोरोसिस किंवा कमकुवत हाडांचा धोका असलेल्या वृद्ध व्यक्तींसाठी विशेषतः महत्त्वाची आहे. मोफत वैद्यकीय सल्ल्यासोबतच, रुग्णांना काही मोफत औषधे मिळतील. आवश्यकता असल्यास, सांध्यांना सपोर्ट करणारे पट्टे रुग्ण अत्यंत सवलतीच्या दरात खरेदी करू शकतील.
या शिबिरात अनुभवी फिजिओथेरपिस्ट *डॉ. संदीप करे (PT)* आणि *डॉ. स्वप्ना करे* (MD Ayu) *पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, आणि इतर हाड व स्नायू दुखणे* यासारख्या समस्या सोडवतील. फिजिओथेरपी आणि आयुर्वेद यांच्या संयुक्त उपचार पद्धतींचा रुग्णांना फायदा होईल.
*हे शिबिर विनामूल्य आहे, कोणतीही नोंदणी, प्रवेश फी नाही.* तथापि, सर्व उपस्थित रूग्णांसाठी सुरळीत सेवा सुनिश्चित करण्यासाठी अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अधिक चौकशीसाठी किंवा तुमची *अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी, कृपया 8459006670, 9225803745* वर संपर्क साधा.
*सर्वांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन सांधेदुखीपासून आराम मिळवावा तसेच बोन मिनरल टेस्ट करून आपल्या हाडांची ताकद ओळखून ती सुधारावी आणि फ्रॅक्चरचा धोका टाळावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे अध्यक्ष रोटे. हिराकांत साळवी यांनी केले आहे.*
Comments
Post a Comment