अनेक महिने शाळांना पोषण आहाराचे धान्य मिळाले नाही.
राज्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहार हा एक गंभीर विषय आहे.
एका बाजूने रोजच्या रोज उसनवार घेऊन शिक्षकांनी हा पोषण शिजवून देण्याची कंपल्सरी आहे.
आणि याबाबत कुठल्या शिक्षकाची कसलीही तक्रार नाही.
गेल्या अनेक महिने शाळांना पोषण आहाराचे धान्य मिळाले नाही.
शाळांना कुठलेही अनुदान नाही.
लाईट बिलासाठी हात पसरायचे.
अनेक योजनांचे पैसे संस्थानी खायचे आणि इंटरनेट वरती रात्र रात्र शिक्षकाने खपायचे..
कंत्राटी शिक्षक भरती होऊ नये म्हणून शिक्षकांनी एक दिवसाची रजा आंदोलन केले. पण
गुणवत्ता नसलेल्या लोकांना घेऊन...यापुढे कंत्राटी शिक्षकांची सुरुवात केले गेले.
याला सुधा एका संघटनेच्या जबाबदार पदाधिकारी याने साथ दिली
पण शिक्षक आपली अस्मिता विसरल्यामुळे शिक्षकाला सगळ्यांनी हलक्यात घेतलेले आहे.
ज्या राजकारणाचे
नेते घडवण्याचे काम शिक्षक करतो त्याला कुठलाही ग्रामस्थ,कुठलाही सदस्य ,कुणी यावें टिकली मारून जावे..
अशी गत शिक्षकांची झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षकाविरुद्ध खोटी तक्रार आली की लगेच चौकशीचा ससे मिरा लावतात.
त्यामुळे कोणत्याही कारण असो शिक्षकाला ब्लॅकमेलिंग करणे सोपे झाले.
आज मुलांना साईज मध्ये शूज मिळाले नाहीत.
शिक्षक धावपळ करून शूज बदलून आणतो.
5 महिने झाले अजूनही शाळांना कपडे ,सॉक्स मिळाली नाहीत.
गोरगरीब मुलांच्या पालकांना उत्तरे शिक्षक देतो..
मात्र साहेबाला ऐकायची सवय नाही.
गरिबीच्या परिस्थितीमधून मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर गरिबांच्या समस्या सोडवण्याऐवजी तुमचे तुम्ही बघून घ्या.
तुम्हाला ऍडजेस्ट करता येत नाही का.
अशी साहेब गिरी
आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे.
साक्षरता मोहीम, वाचन चळवळ, ऑनलाइन कामे, अशा अनेक जबाबदाऱ्या सोबत
शासन मात्र बेजबाबदाऱ बे परवा होत आहे.
यात मुलांचे होणारे नुकसान शिक्षक म्हणून वेदनादायी आहे.
अनेक संघटनेचे अनेक नेते... आणि त्यांना कोणीच विचारत नाही.
कोणी राजकीय भांडी घासतो... तर कोण अधिकाऱ्यांचे तळवे चाटत असतो..कोणी आपल्याच बांधवांचा काटा काढायचा प्रयत्न करतो.
पूर्ण जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामधून मात्र काहींनी डरकाळी फोडायला सुरुवात केली आहे.
शिक्षकांनी सर्व कामे वेळेत केली पाहिजेत.
आणि प्रशासनाने काहीही केले नाही तरी चालेल.
शिक्षकाने आपल्या आस्मिता जपली पाहिजे. तर यांना गुरु म्हणून मान मिळेल..
पोषण आहार ची उसणवारी करणे हे माझे काम नाही ते मी करणार नाही हे सर्वांनी ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टामध्ये दाद मागण्याची हिंमत शिक्षकांनी दाखवणे गरजेचे आहे.
नियम हे सर्वांना सारखे असतील... प्रत्येक शिक्षकांनी पाळायची.. प्रशासनाने मात्र मन मानेल तसे काम करायचे.
कुणीही पदाधिकाऱ्याने दम दिला तर अधिकारी पाहिजे तसे वागतात...
पण शिक्षकांची व्यथा ऐकून घ्यायला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेळ नाही.
पेपर घ्या पण त्यासाठी पेपर नाहीत..
अन्न शिजवा आणि त्यासाठी तांदूळ नाही..
करोडो रुपयांची उधळण चालू असताना गरीब मुलांच्या पोटाचा घास काढून घेताना आय ए एस केडरच्या अधिकाऱ्यांना लाज सुद्धा वाटत नाही.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
निधी नसला म्हणून काय झालं तुमच्या पगारातून शिजवून घाला..
जेव्हा जिल्हा परिषदेला फंड कमी पडतो तेव्हा हे आपल्या पगारातून का घालत नाहीत.
Comments
Post a Comment