“मी 'चीफ मिनिस्टर' नाही, तर 'कॉमनमॅन'” म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले, “सर्वांना माहिती आहे की ते…”
सीएम म्हणजे लोक चीफ मिनिस्टर असं म्हणतात, पण माझ्या मते सीएम म्हणजे कॉमनमॅन असा होतो. मी कॉमनमॅन म्हणजेच सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे मला सर्वसामान्य जनतेत जाताना कोणतीही अडचण होत नाही, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानावरूनच आता आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे. तसेच त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भाजपालाही लक्ष्य केलं.
आदित्य ठाकरे यांनी नुकताच ‘इंडिया टुडे’ या वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, महाराष्ट्रात प्रत्येकाला माहिती आहे की ते ‘कॉमनमॅन’ नाही तर ‘काँट्रक्टर मंत्री’ आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
Comments
Post a Comment