दोन चालकांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा

रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील जवाहर चौक ते गणेशघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणात इतर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वा. कालावधीत करण्यात आली आहे. संदेश सुरेश आंबेकर (वय ३३, रा. खेडशी, रत्नागिरी) आणि हनिफ युनूस साखळकर (वय ५२, रा. नाणार इंगळवाडी, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. यातील संदेश आंबेकर याने आपल्या ताब्यातील मिनी बस तर हनिफ साखळकरने आपल्या ताब्यातील इको गाडी या सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा होईल अशा रितीने उभी केली होती. त्यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment