कापसाळ - चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..!
आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा माटे हॉल कापसाळ - चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रताप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेला १८० सभासद उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन वैभव पवार यांनी केले या सभेत सर्व बैलगाडा चालक - मालक यांनी स्वप्नील शिंदे आणि सर्व कमिटीचे आणि सभासदांचे स्वागत करुन दरवर्षी चांगल्या प्रकारे बैलगाडा शर्यतीच्या जास्तीत जास्त स्पर्धा घेण्यात याव्या असा संकल्प करण्यात आला आहे यावेळी रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रताप शिंदे यांनी या सभेला मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष स्वप्नील शिंदे, कार्याध्यक्ष अजय साळवी, उपाध्यक्ष अजित शिंदे, राजेंद्र साळवी, सतिश आंब्रे, सचिव सुरज घाग, सह. जितेंद्र शिंदे, तुषार लांजेकर, निलेश देसाई, खजिनदार विनायक पिटले, सह. खजिनदार सुधीर सावर्डेकर, सल्लागार नितीन राजेशिर्के, सतीश जांबुर्गे, सुरेश राणे यांचेसह १८० सभासद उपस्थित होते.
Comments
Post a Comment