*बनावट "गोल्ड फ्लेक" सिगारेट बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, १५ अटकेत*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*बनावट "गोल्ड फ्लेक" सिगारेट बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, १५ अटकेत*
पाच कोटींचा मुद्देमाल जप्त
गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवून वेगवेगळ्या राज्यात वितरण करणाऱ्या कंपनीवर रायगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंपनी चालवणाऱ्या १५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
कर्जत येथील सागंवी गावात एका निर्जन ठिकाणी असलेल्या आलिशान फार्महाऊस मध्ये ही कंपनी बेकायदेशीरपणे थाटण्यात आली होती. पंधरा कर्मचारी तिथे काम करत होते. सिगरेट बनवण्यासाठी लागणारे साहीत्य आणि तीन मशिन्स या ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाने दररोज १५ लाख रुपयांची सिगरेट्स या ठिकाणी बनवल्या जात होत्या.
संरक्षक भिंतीवरुन उड्या मारत केला प्रवेश तपासात सांगवी गावच्या नदीच्या कडेला असणाऱ्या अलिशान फार्म हाऊसवर धाड टाकण्यात आली. पण फार्महाऊसला भक्कम तटबंदी व उंच असलेले संरक्षित भिंत होती. तसेच सदर संरक्षित भिंतीला मोठे दरवाजे होते ते आतून बंद असल्याचे आढळून आले. दरवाजे उघडण्यासाठी आवाज देण्यात आला. परंतु आतून प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून पथकापैकी काही कर्मचाऱ्यांनी पाठीमागील नदीच्या बाजूला असलेल्या संरक्षित भिंतीवरून फॉर्म हाऊसमध्ये उड्या मारत प्रवेश केला. पोलिसांना पाहून आतील एक कामगाराने दरवाजा उघडला. त्यानंतर पोलिसांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता, एक मोठ्या गाळयामध्ये गोल्डप्लेंग कंपनीच्या नावाचे सिगारेट निर्मिती करीत असलेले मोठ-मोठ्या मशिनवर १५ कामगार आढळून आले.
आंतरराज्य टोळीचा पर्दापाश
याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात बनावट कारखाना चालवणारे कुमार विश्वकर्मा (मध्यप्रदेश), कम्मारी राजेश्वर (तेलंगाणा), लेक राम सोनी (छत्तीसगड), महमद बशीर (तेलंगणा) नारायण सर्वनारायण (तेलंगणा), सिध्दार्थ कोल्हटकर (महाराष्ट्र), मनोहर खांडेकर (महाराष्ट्र), दुर्गाप्रसाद अनुसुरी (आंध्रप्रदेश), रवी पिथानी (आंध्रप्रदेश), युसुब शेख (महाराष्ट), कैलास कोल्हटकर (महाराष्ट), मनीकंटा लावीटी (आंध्रप्रदेश), हरिप्रसाद चाकली (तेलंगाणा), सोहेल सिंग (उत्तरप्रदेश), हरिश मोर्या (उत्तरप्रदेश) या पंधरा आरोपीविरोधात विरूध्द कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. २६७/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १२३.३१८ (२) ३९८(४).३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात सदर १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडे चौकशी केली असता त्यांचेकडे सिगारेट बनविण्याकरीता लागणारे गोल्ड फ्लेग कंपनीचे संमती अथवा करारपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना चालविण्याकरीता विद्युत महावितरण कंपनी यांना संशय येऊ नये म्हणून वीज न वापरता जनरेटर वापरत असल्याचे आढळून आले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत. सदर तपासादरम्यान सदर कारखान्याचा मालक, जागेचा मालक, सिगारेट बनविण्याकरीता लागणारे मटेरियल कुठून आले, तयार केलेली सिगारेट कुठे-कुठे वितरीत करण्यात आली याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा