देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आव्हान, “महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा..”

 


आज महायुतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांचं रिपोर्टकार्ड सादर केलं. एवढंच नाही तर आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, खुर्ची हे आमचं लक्ष्य नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंखनाद या एका शब्दाने एक्स पोस्ट केली होती. राज्यात निवडणुकींचा शंखनाद झालाय, असं त्यांना म्हणायचं होतं. आजही महायुतीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झाला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


Comments