साखरी त्रिशूळ सुतारवाडी येथे स्मशानभूमी रस्त्याचे भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते भूमिपूजन..!

आबलोली (संदेश कदम)            
गुहागर तालुक्यातील साखरी त्रिशूळ सुतारवाडी येथील एसटी स्टँड ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, सरपंच सचिन म्हस्कर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्याची मागणी सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी माजी आमदार डॉ विनय नातू यांच्याकडे केली होती. त्यानुसार या कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निलेश सुर्वे यांनी पाठपुरावा करत भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यामार्फत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे संपर्क साधत जिल्हा नियोजन मधून रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला.या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून तसेच महायुतीच्या सरकार मार्फत आता तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे होऊ घातली आहेत यापुढेही पक्ष या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देणार असून आता कोणतेही विकास कामे राहणार नाहीत मात्र येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी विकास कामे करणाऱ्या पक्षाला सहकार्य करणे व त्यांना निवडून आणणे फार गरजेचे आहे. या युती सरकारच्या काळामध्ये आपल्याला अनेक योजनांचे लाभ मिळत आहेत यापुढेही असे लाभ सर्व महिला वर्गाला मिळत राहतील यात आपण कोणतेही शंका बाळगू नये. फसव्या आश्वासनांना बळी न पडता काम करणाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून या तालुक्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.तरच आपल्या तालुक्याचा विकास होईल. यावेळी या कार्यक्रमाला सरपंच सचिन म्हस्कर, माजी सरपंच सौ सुवर्णा भोसले, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, संतोष सांगळे,ग्रामपंचायत सदस्य सौ बेटकर, राकेश चाफे, अशोक चिवेलकर, प्रमोद जाधव आदींसह ग्रामस्थ तसेच महिला बहूसंख्येने उपस्थित होत्या.

Comments