*महाराष्ट्रातल्या वाचन चळवळीत सर्वोत्कृष्ट काम करणारे 196 वर्षाचे सर्वात जूने पण अद्यायावत वाचनालय!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*महाराष्ट्रातल्या वाचन चळवळीत सर्वोत्कृष्ट काम करणारे 196 वर्षाचे सर्वात जूने पण अद्यायावत वाचनालय!*

माझ्या रत्नागिरी विधानसभेतील ही अभिमानाची गोष्ट - ना. उदय सामंत 

आज महाराष्ट्र शासनातील दोन जेष्ठ मंत्री ना. रवींद्र चव्हाण व ना. उदयजी सामंत यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाला एकत्र आवर्जून भेट दिली. त्याप्रसंगी वाचनालयात उपस्थित असणा-या वाचक बंधू भगिनींना समोर आपले शुभेच्छापर विचार मंत्रीद्वयीनी ठेवले.
स्वा. सावरकरांसारख्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभलेले हे वाचनालय. या वाचनालयाने ठेवलेली उत्तम व्यवस्था आणि वाचनालयाची प्रदीर्घ वाटचाल, येथील 1 लाख 14 हजार पुस्तकांचे समृध्द ग्रंथभांडार हे सुसंस्कृत रत्नागिरीची ओळख आहे. असे सांगत वाचनालयाच्या पुनर्बांधकामासाठी आपले संपूर्ण सहकार्य राहील असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

ना. उदय सामंत यांनी मुक्त कंठाने अॅड. दीपक पटवर्धन यांचे रचनात्मक कामाची प्रशंसा करत हे वाचनालय त्यांनी उत्तम पद्धतीने विकसित केले आहे. या वाचनालयाला 30 वर्ष मुदतीने जागा उपलब्ध व्हावी म्हणून मला माझ्या पदाचा वापर करुन योगदान देता आले हे माझे भाग्य आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता प्राप्त झाला. त्यामुळे आता वाचनालयांचे महत्व वाढणार आहे. अशा कालखंडात माझ्या रत्नागिरी मतदार संघातील हे ग्रंथसंपदा आणि दर्जेदार वाचक यांची मांदयाळी असल्याने या वाचनालयाला अधिक प्रभावी काम करता येईल, ग्रंथसंपदेने समृध्द असणारे हे वाचनालय उत्कृष्ट काम करत आहे, हे वाचनालय माझ्या मतदार संघात आहे ही बाब माझ्यासाठी व रत्नागिरीकरांसाठी अभिमानाची आहे, असे सांगत ह्या वाचनालयाच्या भविष्यातील सर्व उपक्रांसाठी शुभेच्छा देत अॅड. पटवर्धन यांचे पाठीशी ठामपणे उभे राहू असे ना. उदय सामंत म्हणाले.
या प्रसंगी मंत्रीद्वयींचा शाल  श्रीफळ पुष्प करंडक देऊन वाचनालयाचे वतीने अॅड. दीपक पटवर्धन यांनी सत्कार केला. या प्रसंगी श्री. बबनराव पटवर्धन, संतोष पावरी, श्रीराम भावे, केदार करंबेळकर, शिरिष दामले यांचेसह मोठा वाचकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर यांनी केले.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org