राज्य ग्रामसेवक युनियन गुहागर तालुका संघटनेच्या वतीने ग्रामसेवकांनी केला आनंदोत्सव साजरा..!१४ वर्षाच्या लढ्याला आले यश..!

आबलोली (संदेश कदम) 
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे नाव बदलून आता ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आले आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठक घेण्यात आलेल्या या नव्या पदोन्नतीच्या निर्णयाचे गुहागर तालुक्यातून स्वागत करण्यात येत आहे. याबद्दल ग्रामसेवकांनी राज्य ग्रामसेवक युनियन गुहागर शाखेच्या वतीने पंचायत समिती गुहागर सभागृहात एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला
                           यावेळी गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तर ग्रामविस्तार अधिकारी शरद भांड यांनीही या आनंदोत्सवात सहभाग घेतला.यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात युनियनचे अध्यक्ष बाबूराव सुर्यवंशी यांनी राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम, सरचिटणीस सुचित घरत तसेच राज्य,जिल्हा व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सभासदांच्या १४ वर्षाच्या लढ्याला या निर्णयाच्या माद्यमातून यश आले आहे. यामुळे सर्व ग्रामसेवकांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले.

Comments