*यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई च्या कोकण विभागीय अध्यक्षपदी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांची निवड
*यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई च्या कोकण विभागीय अध्यक्षपदी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांची निवड झाली. तर सदस्य पदी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दत्तात्रय (बाळू )ढवळे यांची निवड करण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुबई ची कार्यकरणीची सभा दि.9/04/2022रोजी मुंबई येथे प्रतिष्ठान चे अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे. उपाध्यक्ष अरुणभाई गुजराती , प्रतिष्ठान चे कोषध्यक्ष आमदार हेमंत टकले साहेब. प्रतिष्ठान कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले साहेब व अन्य कार्यकरणी सदस्य यांची उपस्थितीत संपन्न झाली. सदर सभेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागिय अध्यक्ष पदी चिपळूण संगमेश्वर चे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम साहेब एकमताने निवड करण्यात आली. तर आमदारच्या जवळचे, विश्वासू सहकारी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व जिल्हा कार्यकरणी सदस्य श्री बाळू शेठ ढवळे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.सदर निवडीबद्दल आमदार शेखरजी निकम साहेब व कार्यकरणी सदस्य पदी बाळुशेठ ढवळे.यांच्यावर मतदारसंघतील पदाधिकारी व कार्यकर्ते अभिनंदन केले. सदर निवडीचे पत्र बाळू शेठ ढवळे यांना प्राप्त झाले आहे. आमदार शेखरजी निकम साहेब यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडणार आहे. अशी प्रतिक्रिया बाळुशेठ ढवळे यांनी दिली व आमदार शेखरजी निकम साहेब यांचे आभार मानले. तसेच यशवंतराव प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदरणीय देशाचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार सुप्रिया ताई सुळे,अरुभाई गुजराती आमदार हेमंत टकले साहेब . यांचे देखील आभार बाळुशेठ ढवळे यांनी मानले*
Comments
Post a Comment