"श्री स्वामी समर्थ दर्शन" वेब सिरीज ला उत्स्फूर्त प्रतिसाद!स्वामी भक्तांसाठी " श्री स्वामी समर्थ दर्शन " ही नवीन वेब मालिका

"श्री स्वामी समर्थ दर्शन" वेब सिरीज प्रदर्शित पनवेल ( वार्ताहर ) श्री स्वामी समर्थ या वेब सिरीजला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पनवेलचे अभिनेता रत्नकांत म्हात्रे यांनी खास सर्व स्वामी भक्तांसाठी " श्री स्वामी समर्थ दर्शन " ही नवीन वेब मालिका प्रसारित केली आहे. ही वेब सिरीज मराठी असून तिचे सादरीकरण स्वत रत्नकांत यांनी केलेले आहे. आशारत्न या यूट्युब वरील वेब चॅनेलवर 1 जानेवारीला ही मालिका प्रदर्शित झाली असून ती 31 डिसेंबर रोजी समाप्त होईल. 365 भागांची मालिका ही 365 दिवस चालेल , म्हणजेच सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ यांचे नित्य दर्शन होईल. रत्नकांत म्हात्रे यांची ही 16 वी वेब सिरीज आहे. सोशल मीडियावर स्वामी भक्तांचे बरेच ग्रुप मंडळ कार्यरत आहेत. यामधे भक्तगणांची संख्या 15 लाख पर्यंत आहे. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांसाठी व रसिक प्रेक्षकांसाठी ही मालिका एक सामाजिक बांधिलकी म्हणून या नवीन वर्षासाठी अभिनेता रत्नकांत यांची एक प्रेमाची भेट आहे. सर्व जनतेला स्वामींची सविस्तर माहिती मिळेल व त्यांची महती पटेल

Comments