भव्य रक्तदान शिबीर गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे संपन्न.*

*निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि मित्र मंडळ यांच्यावतीने जीवन दाता विद्याधर ऊर्फ विजू आप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे संपन्न.*
सलग 88 वेळा रक्तदान करणारे अबलोली गावचे सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्ती अध्यक्ष श्री विद्याधर राजाराम कदम उर्फ विजू आप्पा यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त निर्मल ग्रामपंचायत अबलोली व मित्र मंडळ यांच्या वतीने आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर गारवा कृषी पर्यटन केंद्र अबलोली येथे संपन्न झाले .
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दिपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. गुहागर पत्रकार संघाने जीवनदाता पुरस्कार देऊन गौरविलेले विजुआप्पा कदम यांनी आजवर 87 वेळा रक्तदान केले आहे त्यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त एकूण 88 रक्तदात्यांच्या मार्फत रक्तदान करून आप्पांना वाढदिवसाच्या निमित्त अनोखी भेट देण्याचा संकल्प निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि मित्र मंडळ यांनी केला. 
87 रक्तदात्यांसह 88 वे रक्तदान स्वतः जीवनदाते विजू आप्पा कदम यांनी केले. सदर शिबिरात पंचायत समिती सदस्य श्री.रविंद्रजी आंबेकर,व आबलोली गावातील ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. नरेश निमुणकर, श्री. प्रमोद गोणबरे, श्री. महेंद्र कदम, श्री. बाबा वैद्य, सौ.अल्पिता पवार,पोलीसपाटील श्री.महेश भाटकर, गारवा पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक व खोत श्री.सचिन कारेकर, श्री.प्रमेय आर्यमाने ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांचेसह पालपेणे गावातील श्री. उमेश खैर व मित्र मंडळ तसेच आबलोली गावातील ग्रामस्थ यांनी यांनी रक्तदान करून श्री आप्पा कदम यांच्या कार्याला सलाम करून अनोखी अशी भेट दिली.
       यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वीताई निमुंणकर, उपसभापती श्री. सिताराम ठोंबरे, पोलीस निरीक्षक बी. के. जाधव साहेब, गुहागर शिवसेना तालुका प्रमुख श्री सचिन बाईत पं.स सदस्य श्री रवींद्र आंबेकर सरपंच श्री.तुकाराम पागडे माजी सरपंच श्री. नरेश निमुणकर, श्री. प्रमोद गोणबरे, श्री. महेंद्र कदम, श्री. बाबा वैद्य, सौ. अल्पिता पवार
श्री.पोलीस पाटील महेश भाटकर, गारवा पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक व खोत श्री.सचिन कारेकर, आनंद बुद्ध विहार अध्यक्ष श्री. दत्ताराम कदम, अविनाश कदम,ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी , खोडदे तंटामुक्ती अध्यक्ष श्री संदीप साळवी, श्री. राजेंद्र साळवी, श्री. सुहास गायकवाड सर, श्री. रेडेकर सर, श्री. रेपाळ सर, श्री. होवाळे सर, बौ.स.संघ शाखा 50 अध्यक्ष श्री उदय पवार ,बौ स संघ तालुकाध्यक्ष सुनील जाधव शिवसेना युवा पदाधिकारी उमेश खैर ,सुरेश हडकर व मित्र उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत यांनी रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले तसेच रक्तदात्यांना जिल्हा रुग्णालया मार्फत मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली यावेळी पत्रकार श्री.संदेश कदम आणि ग्रामस्थ इ. मान्यवर मंडळी उपस्थित होती. शेवटी ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.प्रमेय आर्यमाने यांनी सर्व रक्तदाता व उपस्थित मान्यवरांचे तसेच  जिल्हा रुग्णालय रत्नागिरी रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि पंचक्रोशीतील मदत करणारे सर्व ग्रामस्थ यांचे ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने आभार व्यक्त केले.

Comments