रत्नागिरी दौ-यावर आलेले गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे कॉंग्रेस पदाधिका-यांनी केले स्वागत

रत्नागिरी प्रतिनिधी:-
राज्याचे गृह राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना.सतेज पाटील रत्नागिरी दौ-यावर आले असता त्यांचे रत्नागिरीतील कॉंग्रेस पदाधिका-यांनी स्वागत केले. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, जिल्हा प्रवक्ते अशोकराव जाधव, महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्षा अॅड.अश्विनी आगाशे, महिला प्रदेश कॉंग्रेसच्या श्रीम.रुपाली सावंत, रत्नागिरी शहर कॉंग्रेस अध्यक्ष राकेश चव्हाण, रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्षा रिझवाना शेख, महिला कॉंग्रेस शहर अध्यक्षा श्रीम.गोगावले आदी उपस्थित होते.

Comments