अनिल परब यांनी दापोलीत बांधलेलं रिसॉर्ट बेकायदा, महसूल खात्याची लोकायुक्तांसमोर माहिती

परिवहन मंत्री अनिल परब यांचं दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची माहिती महसूल आणि वनखात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी लोकायुक्तांसमोर दिलीय. रिसॉर्ट बांधण्यात आलेल्या जमिनीला बनावट कायगदपत्रांच्या आधारे चुकीच्या पद्धतीनं बिनशेती दर्जा देण्यात आल्याचं करीर यांनी सांगितलं. त्यामुळे रिसॉर्टचं बांधकाम बेकायदा आहे आणि यात सीआरझेड नियमांचंही उल्लंघन झालंय. किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एन. कानडे यांच्यासमोर या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी झाली. तेव्हा करीर यांनी ही माहिती दिली.

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923


टिप्पण्या

news.mangocity.org