लोटे औद्योगिक क्षेत्रातील २३ वर्षीय तरुण बेपत्ता



खेड : 
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रातील लोटे चाळकेवाडी येथील २३ वर्षीय संकेत अनंत इंगळे हा तरुण दि.६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कंपनीत काम ला जातो, असे सांगून घराबाहेर
पडला. तो अद्यापही घरी आला नाही. त्याचा शोध घेतला असता त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्याचे वडील अनंत राजाराम इंगळे यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सहायक पोलिस उपनिरीक्षक जे. व्ही. घाणेकर करीत आहेत.

Comments