राष्ट्रवादी नेते अजित यशवंतराव यांना भू गावातील ग्रामस्थानी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित यशवंतराव हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल भू गावातील काही ग्रानस्थांनी लांजा येथे जाऊन त्यांचे अभिनंदन केले. भू मधलीवाडीचे गावप्रमुख तानाजी कुंभार, त्यांच्यासोबत प्रकाश सातोपे, प्रविण पाडावे, नितीन लाखण, मयू लाखण, हरी कातकर, सुनिल कुंभार, विशाल सरफरे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील विकासाच्या प्रश्नांबद्दल चर्चाही केली. सदरची माहीती विशाल सरफरे यांनी दिली आहे. 

Comments