रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे आमदार प्रसाद लाड यांच्या निधीतून बिच क्लिनींग मशिन प्रदान

रत्नागिरी प्रतिनिधी:-
भाजपा नेते व विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या स्थानिक आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत बिच क्लिनींग मशिन देण्यात आले. हे मशिन बुधवारी गणपतीपुळे समुद्रकिना-यावर कार्यक्रम आयोजीत करुन ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमावेळी भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे, आमदार प्रसाद लाड, भाजपा जिल्हा सरचिटणिस राजेश सावंत, तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मून्ना चंवडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, महिला आघाडीच्या ऐश्वर्या जठार, नगरसेवक उमेश कुळकर्णी, भाई जठार, युवा मोर्चाचे अनिकेत पटवर्धन, राजू भाटलेकर, संजय निवळकर, नंदू चव्हाण, प्राजक्ता रूमडे, संदीप रसाळ, विक्रम जैन, राजन फाळके, संदीप सुर्वे, राजू मयेकर, योगेश हळदवणेकर आदी उपस्थीत होते.

टिप्पण्या

news.mangocity.org