रत्नागिरीतील काँगेस भुवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमीत्त विशेष व्याख्यानाचे आयोजन


 रत्नागिरीतील काँगेस भुवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमीत्त विशेष व्याख्यानाचे आयोजन


रत्नागिरी प्रतिनिधी:

रत्नागिरीतील कॉंग्रेस भुवन येथे  महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उस्तहाने साजरी करण्यात आली. तसेच महात्मा गांधीजींवर आधारित युवक प्रांजळ मोहिते याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले  होते. आता जनतेवर स्वातंत्र्य पूर्वी जसे अन्याय होत होते तसेच आता होत आहेत. महागाईचा आगडोंब पसरला आहे, शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अश्या प्रसंगी गांधीजींच्या विचाराची गरज आहे. नाहीतर पुन्हा जनता पारतंत्र्यात जाण्याची शक्यता आहे. असे ठाम मत प्रांजळ मोहिते यांनी मांडले. तदप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व नवी मुंबई महानगर पालिकेचे नगरसेवक अविनाश लाड, प्रदेश सचिव सस्मिता सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पतयाने, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, जिल्हा सरचिटणीस अशपाक काद्री, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, माजी उपनगराध्यक्ष बाळाशेट मयेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ताशेट परकर, महादेव चव्हाण, प्रदीप साळवी, निसार बोरकर, महिला तालुकाध्यक्ष रिजवाना शेख, पुर्ये गावचे उपसरपंच बापू लोटणकर, नूतन गोरिवले, प्रमोद सक्रे, जयसिंग राऊत, दर्शन सक्रे, बाबा विश्वासराव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments