शब्द लहरी
शब्द लहरी
---------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
म्हणौनि आइके देवा । हा भावार्थु
आता न बोलावा । मज विवेकु सांगावा। मऱ्हाटा जी ।।
देखै रोगाते जिणावे । औषध तरी
देयावे । परी ते अति रूच्य व्हावे ।
मधुर जैसे ।।
देवा तुज ऐसा निजगुरू आजि
आर्तीधणी कां न करू । येथ भीड
कवणांची धरू । तू माय आमची ।।
देवा आता मी अशी विनंती
करतो की हा उपदेश असा गूढार्थाने
सांगू नकोस महाराजा । आपला विचार
असेल तर तो मला आडाण्यालाही
समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट
करून सांगा .
रोग नाहीसा व्हावा म्हणून औषध तर द्यावेच परंतु ते औषध
मधुर व अतीव रूचकर असावे.
देवा तुमच्यासारखा गुरू आज
मला मिळाला तेव्हा मी माझ्या मनाची
इच्छा पूर्ण का करून घेऊ नये ? तू
आमची माय आहेस . मग मी भीड
कोणाची धरू ?
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक
---------------------------------------------------
निसर्ग
निसर्ग संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 28 जुलैला विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभरात निसर्ग संवर्धन आणि निसर्गाचे महत्व या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात येतात. या दिवशी जगभरातील लोक निसर्ग सोबतींचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात. आज आपणही संकल्प करायला हवा की निसर्गाला संरक्षित करण्यासाठी आपण सर्वजण एक होऊन प्रयत्न करूया आणि आपल्या निसर्गाचे जतन करूयात.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
दिनांक :- ४/१०/२०२१

Comments
Post a Comment