खदीजा व खातून विद्यालयाचे तालुकास्तरीय 'नात'स्पर्धेत घवघवीत यश
चिपळूण (वार्ताहर):-
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी,खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुलाह सेकंडरी स्कूल या विद्यालयातील कु. हुजेफा मुजाहिद मेयर याने द्वितीय क्रमांक, कु.उमेमा इसाक मुस्तफा हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. सदर स्पर्धा ही कोकण सिरत कमिटी आयोजित तालुकास्तरीय नात स्पर्धा घेण्यातआली होती. प्रशालेने याअगोदर अनेक स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून विविध स्पर्धेत यश प्राप्त केले आहे.स्पर्धेसाठी तालुक्यातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या.सदर स्पर्धा ही शहीद अशफाक उल्ला खान चौक,मौलाना अब्दुल कलाम आझाद नगर, गोवळकोट रोड येथे स्पर्धा संपन्न झाली.तालुकास्तरीय नात स्पर्धेसाठी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. इमरान कोंडकरी मर्चंट नेव्ही ऑफिसर चिपळूण, चिपळूण मुस्लिम समाज श्री.नाजिम अफवारे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.मौलाना वासिफ कासमी, एज्युकेशन सोसायटी अ.रऊफ वांगडे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटी ते विद्यमान चेअरमन डॉ.श्री इसहाक खतीब, व्हा. चेअरमन जफर कटमाले,सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर , मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. उरुसा खतीब,श्री.काशिफ काझमी, विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. खुर्शिद शेख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा