फूल बाजारात उत्साह

फूल बाजारात उत्साह
नवरात्रोत्सवात मंदिरे उघडणार असल्याने आनंदोत्सव
करोनाच्या संसर्गामुळे राज्यातील मंदिरे बंद होती. घटस्थापनेच्या दिवशी (७ ऑक्टोबर) मंदिरे खुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर फूल बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. मंदिरे बंद असल्याने फुलांच्या मागणीत तसेच विक्रीत घट झाली होती. मंदिरे उघडण्याच्या निर्णयामुळे शेतक ऱ्यांना देव पावला, अशी भावना फूल बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ गुरुवारपासून होत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात येणार असल्याने शेतकरी, फूल व्यापारी, हार विक्रेते, सजावटकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवात मंदिरांची सजावट फुलांनी केली जाते. झेंडू, अष्टर, गुलछडी, शेवंती या फुलांच्या मागणीत वाढ होते. गेले काही महिने मंदिरे बंद असल्याने फूल विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. शेतकऱ्यांना बाजारात विक्रीस आणलेल्या फुलांना अपेक्षेएवढे दर मिळत नव्हते, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
मंदिरे उघडण्याच्या निर्णयामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. पावसामुळे फुले भिजली आहेत. चांगल्या प्रतीच्या फुलांना दर चांगले मिळत आहे. पावसाळी वातावरणामुळे यंदा परगाव विशेषत: कोकणातून येणाऱ्या खरेदीदारांच्या संख्येत घट झाली आहे. बाजारात पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर परिसरातून फुलांची आवक होत आहे. गणेशोत्सवात पाऊस पडला होता. तेव्हा फुले भिजल्याने शेतक ऱ्यांचे नुकसान झाले होते. दसऱ्याला फुलांच्या मागणीत मोठी वाढ होते. झेंडूला चांगले दर मिळतात. दसऱ्याच्या तीन दिवस आधी फूल बाजारात फुलांची आवक वाढते. झेंडूसह गुलछडी, अष्टर, कागडा या फुलांची बाजारात चांगली आवक होत असल्याचे भोसले यांनी सांगितले.
फुलांचे दर
’ झेंडू- १० ते ३० रुपये किलो
’ कोलकाता झेंडू- २० ते ४० रुपये किलो
’ कागडा-१५० ते २५० रुपये किलो
’ शेवंती ४० ते १५० रुपये किलो
’ अष्टर- २० ते ५० रुपये किलो
’ जुई- ८०० ते १००० रुपये किलो
मंडईत खरेदीसाठी गर्दी
घटस्थापनेसाठी पूजा साहित्य तसेच फूल खरेदीसाठी मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक परिसरात खरेदीसाठी बुधवारी गर्दी झाली होती. त्यामुळे या भागात वाहतूक विस्कळीत झाली होती. गर्दीतून वाट काढत नागरिकांनी खरेदी पूजासाहित्याची खरेदी केली.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा