दापोली शहर व तालुक्यातील निसर्ग संपदा जोपासणे हे आपल्या हातात आहे -मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी




 दापोली शहर व तालुक्यातील निसर्ग संपदा जोपासणे हे आपल्या हातात आहे -मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहर व तालुक्यातील निसर्ग संपदा जोपासणे हे आपल्या हातात आहे.मी दापोलीच्या प्रेमात पडली आहे हेच प्रेम मला येथे आज घेऊन आले.अशी कौतुकास्पद दापोली कराना अभिमान वाटेल अशी कबुली मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरातील महत्वपूर्ण दोन नवीन स्टेचू आयकॉनच्या सुशोभीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी दापोलीत आली होती.येथील निसर्ग सौंदर्य, दापोली तालुक्यातील समुद्र किनारे, निसर्ग संपदा,खाद्य संस्कृतीच मला कौतुक आहे. या सुंदर निसर्गरम्य दापोलीचे आपण नागरीक आहात तुमच्याबद्दल मला हेवा वाटतो,खुप मस्त आहे,मला तुमच्याबद्दल जेलसी वाटते,आम्हाला मुंबईत नाही अनुभवता येत असेही तीने यावेळी नमुद केले.

सांस्कृतिक कलाक्षेत्रातही दापोली बदलतय ऍडव्हान्स होतय कोरोना कालावधीनंतर आपल्याला पहिल्यांदा दापोली येथे येण्याची संधी मिळाली यामुळे मी खूपच आनंदी आहे. दापोली विषयी असलेल प्रेम मला येथे घेऊन आले आहे.असेही त्यांनी म्हटले  


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments