मा.ना.उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते होणार रत्नागिरी अंध क्रिकेट संघाच्या निवड चाचणी चे उदघाट्न...


मा.ना.उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते होणार रत्नागिरी अंध क्रिकेट संघाच्या निवड चाचणी चे उदघाट्न...

रत्नागिरी

आस्था सोशल फाऊंडेशन रत्नागिरी च्या आस्था दिव्यांग कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र रत्नागिरी आणि महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून  रत्नागिरी जिल्हाच्या 18 वर्षावरील अंध दिव्यांग मुला-मुलींच्या रत्नागिरी क्रिकेट संघासाठी खेळाडूंच्या निवड चाचणीचे उदघाटन मंगळवार दि.12 ऑक्टोबर 2021 रोजी  मा.नामदार उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.तरी इच्छुक खेळाडूंनी आपली नाव नोंदणी प्रत्यक्ष आस्थाच्या

छत्रपती शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथील ऑफिस मध्ये  किंवा आस्था दिव्यांग हेल्पलाईंन च्या 9834440200 या नंबर वर कॉल करून करावी.निवड चाचणी च्या वेळी खालील कागदपत्रे सोबत आणावी.

1. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे 40% वरील अपंग(अंध)प्रमाणपत्र 

2. आधार कार्ड

3. रेशन कार्ड

4. दोन पासपोर्ट साईज फोटो 

5 .रत्नागिरी अंध क्रिकेट संघात खेळण्यासाठी तयार असले बाबत कुटुंबाचे संमती पत्र आवश्यक असेल असे आस्थाच्या वतीने सचिव सुरेखा पाथरे, व आस्था दिव्यांग हेल्पलाईनच्या वतीने संकेत चाळकेंनी प्रेसनोट द्वारे सांगितले . 


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
....................................... .

टिप्पण्या

news.mangocity.org