ओम पाडळकर तसेच दिग्दर्शक नंदू जुवेकर ची कोकणाआडचे कोकण

 ओम पाडळकर तसेच दिग्दर्शक नंदू जुवेकर ची कोकणाआडचे कोकण

     रत्नागिरीतील नवोदित आणि युवा कलाकारांनी एकत्र येऊन कोकणातील वैभव जगासमोर आणण्याकरता कोकणा आडचे कोकण या युट्युब चॅनेल ची निर्मिती केली आहे. आणि आज दिनांक 7 ऑक्टोबर 2021 रोजी नवरात्रीतील घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून *दर्शन नवदुर्गाचं* या उपक्रमात त्याची सुरुवात करण्यात आली.
     पहिल्या उपक्रमातील दर्शन नवदुर्गाचं या माध्यमातून  रत्नागिरी तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील प्रसिद्ध अशा जागृत शक्ती स्थळांची माहिती या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एक शक्तिस्थळ या अनुक्रमे दिली जाणार आहे. यातून प्रत्येक शक्ती स्थळाच्या येथे असणाऱ्या देवीचे दर्शन, तिची होणारी पूजाअर्चा या संदर्भातील माहिती तसेच देवीच्या  देवस्थान ट्रस्टमार्फत केले जाणारे उपक्रम याची संपूर्ण माहिती याद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. 
     रत्नागिरीतील नवोदित छायाचित्रकार ओम पाडळकर तसेच दिग्दर्शक नंदू जुवेकर यांनी एकत्र येऊन या युट्युब चॅनेलची  निर्मिती केली आहे आणि स्वतः त्या त्या विभागातील जबाबदारी पार पाडली आहे. यामध्ये कलाकार म्हणून अमोल मयेकर, हर्ष नागवेकर, नंदू जुवेकर, ओम पाडळकर यांनी काम केल आहे.
      चला तर मग... आमच्या या प्रवासात तुम्हीसुद्धा सहभागी व्हा..! तुम्हा सर्वांचे *दर्शन नवदुर्गांच* या कार्यक्रमात सहर्ष स्वागत...!

नमस्कार...! 
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा...! नवरात्रीचा पहिला दिवस...! स्त्री शक्तीच्या जागरणाची सुरुवात...! या शुभ मुहूर्तावर कोकणाआडचे कोकण या youtube चॅनल च्या माध्यमातून  आम्ही घेऊन आलो आहोत, दर्शन नवदुर्गांचे...! कोकणातील जागृत देवस्थानांचे दर्शन तुम्हाला घडवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न...! चला तर मग... आमच्या या प्रवासात तुम्हीसुद्धा सहभागी व्हा..! तुम्हा सर्वांचे *दर्शन नवदुर्गांचे* या कार्यक्रमात सहर्ष स्वागत...!
https://youtu.be/05vaz4CUjIw
 चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका !🙏🏻

टिप्पण्या

news.mangocity.org