रत्नागिरी जिल्ह्यात विज बिलांवर विज मिटरचा फोटो येणे ग्राहकांच्या माहितिकरिता आवश्यक
जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या महावितरणला सुचना
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी जिल्ह्यात जी विज बिले वितरित केली जातात. त्या विज बिलांवर विज मिटरचा फोटो येत नाही. यापूर्वी येत होता. मात्र आता विज मिटरचा फोटो छापला जात नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे विज ग्राहकांच्या माहितीसाठी प्रत्येक विज बिलावर मिटरचा फोटो छापून आला पाहिजे अशा प्रकारच्या सुचना रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी महावितरणला दिल्या आहेत. नुकतीच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत महावितरणसंबंधीत आढावा बैठकीत सदरचा विषय मांडण्यात आला. सध्या विज बिले वसुल करण्यासाठी महावितरणकडून कारवाया होत आहेत. मात्र अनेक ग्राहकांचे मिटर फॉल्टी असतात. गावागावात मिटर रिडिंग घेणारा माणूस नेमका काय करतोय ते समजत नाही. तसेच ऑनलाईन विज बिल तपासण्यासाठी ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नसते. विज बिले वाढीव दराने येत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. अनेकांची बिले पाच, दहा हजार रुपये पेक्षा अधिक येतात. प्रत्यक्षात विज वापर दिसून येत नाही. महावितरणचे नेमके नियम काय आहेत याबाबत ग्राहकांना माहीती नसते. अशा अनेक प्रश्नांमुळे ग्राहक संतप्त झाला आहे. हिच बाब विचारात घेऊन पुर्वी जशी विज बिलांवर विज मिटरचे फोटो येत होते तसेच आताही ते फोटो छापून यावेत अशी सुचना परशुराम कदम यांनी दिल्या आहेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा