परिवहन कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग

परिवहन कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग
महापालिका प्रशासनाचा निर्णय; ११०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना लाभ
अखेर परिवहन सेवेतील कायम कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगारापासून ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिका ही आस्थापनावर सर्वात कमी खर्च करणारी महापालिका आहे. शासनाच्या नियमानुसार त्या त्या सरकारी आस्थापनांनी कमीत कमी ३५ टक्कय़ापर्यंत आस्थापना खर्च करण्यास हरकत नाही. परंतु नवी मुंबई महापालिकेत आस्थापनावर शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षाही कमी खर्च होतो. त्यामुळे पालिकेच्या विकासात्मक कामांना अधिकाधिक खर्च करता येतो. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक ताळेबंदाचा विचार करता पालिका कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या मान्यतेने सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेच्याच परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्यात आला नव्हता. या आयोगाचा लाभ या कर्मचाऱ्यांनाही मिळावा यासाठी नवी मुंबई महापालिका कर्मचारी सेना युनियनचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, तसेच भाजपचे संजीव नाईक, परिवहन सदस्य समीर बागवान तसेच युनियन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला. या मागणीला यश आले आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी याच महिन्यापासून करण्यात येणार आहे. परिवहन सेवेत जवळजवळ ११०० कायम कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात साधारणत: सात हजारांपासून पुढे सेवेनुसार वाढ होणार आहे. परंतु परिवहन सेवेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोग लागू करावा यासाठी सातत्याने युनियनच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. त्यामुळे याच महिन्यापासून हजारो कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
– विजय नाहटा, अध्यक्ष, नवी मुंबई मनपा कर्मचारी कामगार सेना
शासनाने नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला सातवा वेतन आयोग लागू केला असून याच महिन्यात त्यांना या आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे. या वेतन आयोगाचा परिवहनच्या कायम सेवेतील जवळजवळ ११०० कर्मचाऱ्यांना लाभ होईल.
– योगेश कडुस्कर, परिवहन व्यवस्थापक
परिवहन उपक्रम हा नवी मुंबई महापालिकेचाच भाग असून पालिका कर्माचाऱ्यांना सातवा वेतन आयोग शासनाने मंजूर केला असून परिवहन कर्मचाऱ्यांनाही तो मिळाणार आहे याचा आनंद आहे.
– शहाजी शिंदे, महापालिका कर्मचारी कामगार सेना
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा