चिपळूण तालुक्यातील रामपूर -मिरवणे -गुढे रस्ता मोजतोय अखेरची घटका
*
रस्ता बनावा म्हणून युवक आणि स्थानिकांनी घेतला पुढाकार
प्रतिनिधी :- निलेश कोकमकर
चिपळूण रत्नागिरी,
चिपळूण तालुक्यातील रामपूर- गुढे फाटा- मिरवणे - गुढे कोंडवी ह्या रस्त्याची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. ह्या रस्त्यामुळे अनेक गावे जोडली गेली आहेत. जवळजवळ १० ते १५ गावांचा समावेश आहे. पण सध्या ह्या अशा बिकट रस्त्यामुळे वयोवृद्ध, आजारी व्यक्ती आणि स्थानिकांचे खूपच हाल होत आहेत. आणि ह्याकडे शासकीय आणि राजकिय प्रतिनिधी कोणीच लक्ष देत नाहीत असे दिसून येत आहे. ह्या रस्त्याला २०वर्षे फक्त प्रतीक्षाच करावी लागत आहे. जेव्हा ह्या रस्त्याच्या संपर्कात येणाऱ्या गावातील तरुणांनी प्रवास केला तेव्हा खरी परिस्थिती लक्षात आली आणि त्या संदर्भात आवाज उठवला. तत्पूर्वी मुळात हा रस्ता न होने याला आपण जबाबदार आहोत कारण आपण प्रामाणिक पणे आवाज उठवत नाही अशी खंत व्यक्त केली.
रामपूर - गुढे कोंडवी रस्त्याबाबत अनेक वेळा वयक्तिक - एक गाव - वाडी मंडळ किंवा एखादी संस्था ह्या प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने वेग वेगळ्या नावाने प्रस्ताव पाठवले त्यामुळे कोणत्याच प्रस्ताव विश्वासार्थ ठरू शकला नाही. त्याची दखल ना शासकीय कार्यालयाने घेतली ना राजकीय पक्षाने घेतली. अजूनही प्रत्येकजण आपाआपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे अजूनही रस्त्याबाबत कोणताच मार्ग भेटत नाही. खरं पाहता जेव्हा निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाचे नेते , पुढारी कामाचे स्वरूप घेऊन येतात आणि फक्त आश्वासन देऊन जातात. पण जवळजवळ २० वर्ष आश्वासनावर हा रस्ता राहिला आहे. त्याचा त्रास स्थानिकांनी सहन करावा लागत आहे. याचाच उद्रेक येत्या निवडणूकीत नक्कीच दिसेल असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच स्वर्गातून सुंदर आपले कोकण असे आपण म्हणत असलो तरी कोकणची दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे. होय आणि हे खरं आहे.
हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण व्हावा यासाठी गुढे फाटा - उमरोली - पाथर्डी - शिरवली-मिरवणे- ताम्हणमळा - डुगवे - गुढे - कळंबट - पातीवाडी ह्या गावातील स्थानिक आणि मुंबईतील युवक / ग्रामस्थ
गुढे रोड समन्वय समिती ग्रुपच्या मार्फत एकत्रित येऊन आवाज उठवत आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


खुप छान बातमी प्रसिद्ध करता असेच लोकांच्या गरजा किंवा त्यांचे विचार सर्वांत परियंत पाचावत रहा .👍🏼
ReplyDelete