रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाला १० ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, क्रूझ टर्मिनलचा प्रश्न मार्गी

 रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाला १० ऑक्टोबरपासून होणार सुरुवात, क्रूझ टर्मिनलचा प्रश्न मार्गी


उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहीती


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला 10 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. सुमारे पस्तीस कोटी रुपयांच्या या कामांना सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सच्या वतीने साळवी स्टॉप ते मिरकरवाडा या दरम्यान सिमेंट कॉंक्रीटच्या कामांना व सुशोभिकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी नळपाणी योजना, भूमिगत विजवाहिन्या, गॅस पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असतील त्या ठिकाणी डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात केली जाणार आहेत. अशी माहीती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी गुरुवारी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.  शहरातील नळपाणी योजनेत प्रत्येक घरी मिटर बसवण्यात येणार आहेत. यासाठी नगर परिषदेच्या वतीने सुमारे साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. नागरीकांकडून मिटर बसवण्यासाठी पैसे वसुल केले जाणार नाहित. 

तसेच रत्नागिरीतील विमानतळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी पार्किंगसाठी पन्नास एकर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी रत्नागिरीतील एका नागरिकाने भाडे तत्त्वावर जागा देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. 

रत्नागिरीत क्रूझ टर्मिनलचा प्रश्न होता. भगवतीबंदर ही खाजगी जेट्टी आहे. त्यापेक्षा मांडवी येथे क्रूझ टर्मिनल झाल्यास त्याचा नागरीकांना फायदा होईल. अशी माहीती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
....................................... .

टिप्पण्या

news.mangocity.org