लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल च्या वतीने लायन्स सेवा सप्ताहाचा शुभारंभ
लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल च्या वतीने लायन्स सेवा सप्ताहाचा शुभारंभ
श्री क्षेत्र झरी विनायक गणपती मंदिर, भाटे मंदिर आणि परिसराची स्वच्छता
महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी
रत्नागिरी प्रतिनिधी:-
लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लायन्स सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याहिवर्षी प्रथमच नव्याने स्थापन झालेल्या लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल तर्फे विविध सेवा कार्याच्या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. याचेच औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:00 वा. श्री क्षेत्र झरी विनायक मंदिर, भाटे आणि परीसराची स्वच्छता क्लबच्या वतीने करण्यात आली. यावेळी मंदिर आणि मंदिर परिसरालगत असणारा कचरा, चिप्सचे कागद, मास्क, बाटल्या, पालापाचोळा इ. गोळा करण्यात आला. 2 तास चाललेच्या या श्रमदानावेळी लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचे अध्यक्ष ला. मनोजकुमार खानविलकर, सचिव ला. सैफुद्दिन पठाण, खजिनदार ला. गिरीश शितप, सहसचिव ला. दत्तात्रय क्षीरसागर, सहखजिनदार ला. डॉ. अंकिता देसाई, ला. संदेश शिंदे, ला. सचिन सावेकर, ला. अवधुत कळंबटे, ला. प्रतिक कळंबटे, ला. शुभाली झगडे, ला. स्नेहा सागवेकर आदी सभासदांसह कु. वरद खानविलकर उपस्थित होते. सदर स्वच्छता सेवाकार्य उरकल्यानंतर गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर आणि श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनि. कॉलेज हातखंबा येथे आयोजित महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यास लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयलचे सर्व लायन सभासद उपस्थित होते. यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका मंदाकिनी मधाळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या महान नेत्यांच्या आत्म्यास आदरांजली वाहण्यात आली. ला. मनोजकुमार यांच्या हस्ते ही प्रतिमेचे औक्षण करुन पुजन करण्यात आले. यावेळेस विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक धीरज पाटील, प्रा. अनिता पाटील, शिक्षक भिमसिंग गावीत, शामसुंदर नारायणकर, प्रा. कळंबटे, केरबा कुराडे, सेवक हरयान, मयेकर मॅडम, पवार मॅडम आदी शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होता. यावेळी उपस्थित लायन्स सभासदांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. ला. अध्यक्ष मनोजकुमार यांनी क्लबला पूजनासाठी संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे आभार मानले. आपल्या सेवाकार्याची उपस्थित शिक्षक, प्राध्यापक यांना माहिती देत छोटेखानी आयोजित कार्यक्रमाची सांगता झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील आयोजित सेवा सप्ताहात हातखंबा पंचक्रोशीतील विविध शाळांना ॲकॅडमीला सॅनिटायझर, टेंमपरेचर मशीन आणि ऑक्सिमीटर वाटणे, माहेर संस्थेला खाऊचे वाटप, झरेवाडी येथे आयोजित डोळे तपासणी शिबीर, डायबेटीस चेक अप कॅम्प, अविष्का शाळेस रद्दी देणे इ. सेवा कार्याचे आयोजन करण्यात आले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा