योगी सरकारने राहुल गांधींना नाकारली परवानगी

योगी सरकारने राहुल गांधींना नाकारली परवानगी
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार आहे. मात्र उतत्र प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारली आहे. या भेटीस परवानगी देण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी सांगितलं होतं. लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेश सरकारने जमावबंदीचं १४४ कलम लागू केलं आहे.
बुधवारी सकाळी राहुल गांधी, सचिन पायलट, चरणजीत सिंग चन्नी, भुपेश बघेल आणि के सी वेणुगोपाल लखीमपूर खेरीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.
लखीमपूर हिंसाचारावरून भाजपा लक्ष्य
मंगळवारी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला. दुसरीकडे, सोमवारी पहाटेपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले.
मृतांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी लखीमपूर खेरीला जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना रोखण्यात आले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना सोमवारी पहाटे ४.३० वाजता सीतापूर येथे विश्रामगृहात स्थानबद्ध करण्यात आले. प्रियंका यांच्यासह ११ जणांविरोधात मंगळवारी कलम १५१, १०७ आणि ११६ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात काँग्रेसचे खासदार दिपेंदर हुड्डा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू आदींचा समावेश आहे. मात्र, या कारवाईबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी ३८ तासांनंतरही आपल्याला संबंधित कागदपत्रे, नोटीस दिलेली नसून, वकिलांनाही भेटू दिले जात नसल्याचा आरोप प्रियंका यांनी केला. ही कारवाईच बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी केला.
तत्पूर्वी, प्रियंका यांनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करणारी एक चित्रफीत प्रसृत केली होती. त्यात शेतकऱ्यांना मोटारीद्वारे चिरडण्यात येत असल्याची चित्रफीत दाखवत प्रियंका यांनी मंत्रिपुत्र मोकाट का, असा सवाल केला.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा