दसरा मेळाव्यासंबंधी संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले…

 


दसरा मेळाव्यासंबंधी संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले…

दरवर्षी होणारा शिवसेनेचा बहुचर्चित दसरा मेळावा गेल्या वर्षी करोनाच्या सावटाखाली पार पडला. यंदाही करोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा होणार, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच त्यांनी या मेळाव्याच्या स्वरुपाविषयीही वक्तव्य केलं आहे. शिवसैनिकांमध्ये त्यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण होणार हे निश्चित.

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊतांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना दसरा मेळावा होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येईल.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org