श्वानाच्या मृत्यूच्या तपासातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त

श्वानाच्या मृत्यूच्या तपासातून स्फोटकांचा मोठा साठा जप्त
बंगळूरु : मंगळूरु शहरात रस्त्यावरील एका श्वानाला गोळी झाडून ठार करण्यात आल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना शोधमोहिमेत एका इमारतीमध्ये ठेवलेला स्फोटकांचा १४०० किलो बेकायदा साठा दिसून आला. पोलिसांनी हा साठा जप्त करून आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा भाग कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यात आहे. आरोपीचे नाव आनंद गट्टी (५०) आहे. या इमारतीमधून पोलिसांनी ४०० किलो पांढरी गंधकाची भुकटी, ३५० किलो पोटॅशिअम नायट्रेट, ५० किलो बेरिअम नायट्रेट, ३९५ किलो पोटॅशिअम क्लोराईड, २६० किलो अॅल्युमिनिअम भुकटी, एअर पिस्टलच्या शंभर ०.२२ पिलेटची १६१ पाकिटे, ३० किलो शिशाच्या गोळ्या आणि २४० किलो कोळसा जप्त करण्यात आला. मंगळूरुच्या शिवबाग नव्या मार्गावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक सुदृढ नर श्वान गोळी झाडून ठार केलेल्या अवस्थेत दिसून आला होता. त्याच्या मृतदेहात ०.२२ पिलेट आढळून आली होती. जिल्ह्यातील आठ शस्त्रास्त्र वितरकांकडे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली. या प्रकारच्या पिलेट आपण विकत नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या श्वानाच्या मृत्यूचा तपास लावण्यासाठी लोकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते. अशी माहिती मिळतात आरोपी आनंद याच्या मालमत्तेवर छापा टाकण्यात आला. आनंद हासुद्धा अनेक वर्षांपासून शस्त्रविक्रीचा व्यवसाय करतो, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तपासाच्या दृष्टीने आणखी माहिती उघड करता येणार नाही, असे पोलीस उपायुक्त हरिराम शंकर म्हणाले. या वर्षाच्या आरंभी चिकबल्लापूर आणि शिवमोगा येथे खाणींमधील स्फोटांत अनेक जणांचा मृत्यूू झाला होता. शिवाय हा भाग नक्षलग्रस्तही आहे. त्यामुळे पोलिसांनी श्वानाचा अशा प्रकारे मृत्यू होण्याची बाब गांभीर्याने घेतली.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment