मॉलप्रवेशासाठी दोन्ही लसमात्रा बंधनामुळे नागरिक नाराज

मॉलप्रवेशासाठी दोन्ही लसमात्रा बंधनामुळे नागरिक नाराज
नागपूर : तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेले शहरातील मॉल अखेर सुरू झालेत. मात्र मॉलमध्ये केवळ करोना लसीची दुसरी मात्रा घेतलेल्यांनाच प्रवेश देत असल्याने नागपूरकरांमध्ये नाराजी पसरली आहे.
सुरक्षारक्षक प्रत्येक ग्राहकांचे दुसरी मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच मॉलमध्ये प्रवेश देत आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक अडचण लहान मुलांची होत आहे. देशात लहान मुलांची करोना प्रतिबंधक लस अजून आली नसल्याने बहुतांश मुलांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे पालकांसोबत खरेदीला आलेल्या मुलांचा हिरमोड होत आहे. त्याशिवाय अनेकांजवळ भेट वस्तूच्या स्वरूपात मिळालेले मॉलमधील खरेदीचे कुपन आहेत. ते वेळेत खर्च करावे लागतात.
त्यांची मुदत गेल्यास ते कुपन निरुपयोगी ठरतात. त्यामुळे ज्यांनी दुसरी मात्र घेतलेली नाही त्यांना या कुपनचा उपयोग प्रत्यक्ष खरेदी न करता ऑनलाईन शॉपिंगद्वारे करावा लागत आहे. अनेक महिन्यांनी मॉल सुरू झाल्याने शहरातील प्रत्येक मॉलबाहेर खरेदीसाठी नागरिकांच्या मोठय़ा रांगा लागल्या आहेत. तेथे येणाऱ्यांची सुरक्षारक्षकांकडून दुसरी लस घेतल्याची तपासणी सुरू आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा