राज्यात आरोग्यासाठी स्वतंत्र संवर्ग! – राजेश टोपे

राज्यात आरोग्यासाठी स्वतंत्र संवर्ग! – राजेश टोपे
मुंबई : करोनासह साथीचे आजार, राष्ट्रीय व राज्य आरोग्य कार्यक्रम, नागरी व ग्रामीण आरोग्य तसेच वाढता असंसर्गजन्य आजारांचा पसारा यांचा विचार करून आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यस्तरावर आरोग्य विभागाची स्वतंत्र संवर्ग (केडर) तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच दुर्गम आदिवासी भागात काम करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त कामावर आधारित विशेष प्रोत्साहन भत्ता दिला जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी, साहाय्यक पोलीस आयुक्त आदी संवर्ग निवडला जातो. त्याचप्रमाणे आगामी काळात आरोग्य विभागासाठी स्वतंत्र केडर तयार करून आरोग्य विभाग बळकट व प्रशासकीयदृष्ट्या सक्षम केला जाणार आहे. यासाठी राज्य शासनाने सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, संचालक डॉ. अर्चना पाटील तसेच अन्य तज्ज्ञांची एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून त्यातील शिफारशीनुसार आरोग्य विभागाचे स्वतंत्र केडर तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय आरोग्य विभागासाठी यापुढे कालबद्ध पदोन्नती दिली जाणार असून आरोग्य भवनातील अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक या वर्षानुवर्षे रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न तातडीने सोडविला जाईल, असे टोपे म्हणाले. आरोग्य विभागाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करून त्याच्या माध्यमातून औषधे व उपकरणे आरोग्य विभागासाठी खरेदी करायची योजना असल्याचे टोपे यांनी सांगितले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा