पुणे महापालिकेतील अधिकाऱ्याला ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

पुणे महापालिकेतील अधिकाऱ्याला ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई; ५० हजार रुपयांची मागितली होती लाच
पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर मागील आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या प्रकरणाची चर्चा राज्यभरात सुरू होती. या घटनेला आठवडा होत नाही. तोवर पुणे महापालिकेतील रस्ते विभागाच्या उपअभियंत्यास आज ४० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुधीर विठ्ठलराव सोनावणे (वय -५१) असे लाच घेणार्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समितीची बैठक संपताच ‘एसीबी’चा छापा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेचे रस्ते विभाग वर्ग २ मध्ये सुधीर विठ्ठलराव सोनावणे नेमणुकीस होते. २०१८/१९ यावर्षी एका शाळेचे दुरुस्तीचे काम फिर्यादीने केले होते. मात्र त्याचे बील अद्याप पर्यंत मिळाले नव्हते. फिर्यादीस आरोपी सुधीर सोनावणे याने ५० हजार रुपये दिल्यास, तुमचे बील पास करून देतो, असे म्हणत लाचेची मागणी केली होती. अखेर ४० हजार रुपये देण्याचे ठरले.या संपूर्ण प्रकरणाची माहिती आम्हाला देताच आज आरोपीला ४० हजार रुपये फिर्यादीकडून घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर आरोपी अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा