मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सिने अभिनेत्री दिपाली ताई (भोसले) सय्यद यांना दिली शाब्बासकीची थाप....
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सिने अभिनेत्री दिपाली ताई (भोसले) सय्यद यांना दिली शाब्बासकीची थाप....
✍️ ताईच्या कार्याचे मुख्यमंत्रीकडून कौतुक
✍️ ताईला लवकरच शिवसेकडून कार्याची पोच पावती मिळणार:मुख्यमंत्रीचे संकेत
रत्नागिरी प्रतिनिधी
(रमजान गोलंदाज)
सामाजिक कार्याचा वसा उचलून सामाजाचे काय तरी देणे लागते या भावनेतून शिवसेना नेत्या व प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली ताई भोसले सय्यद यांच्या दिपाली ताई भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षे समाजिक काम सुरु आहे. ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात ताईनी अनेक प्रकारची मदत केली आहे.गेल्या अनेक वर्षा पासून सिने अभिनेत्री दिपाली ताई भोसले सय्यद यांच्या दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने व पूरग्रस्त भागाची पाहणी करून १०कोटी ची मदत केल्या बदल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी दिपाली ताई भोसले सय्यद यांचे कौतुक करत त्यांना शाब्बासकी ची थाप दिली.
दिपाली ताई भोसले सय्यद यांनी नुकतीच शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही कामा निमित्ताने भेट घेतली. यावेळी राजकीय,सामाजिक विषयांवर दिपाली ताई भोसले सय्यद यांनी चर्चा केली.
शिवसेना नेत्या व प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली ताई भोसले सय्यद यांना शिवसेने कडून लवकरच मोठी जबाबदारी देणार असलेच शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सांगितले दिपाली ताई भोसले सय्यद यांच्या कामाची दखल खुद: मुख्यमंत्री यांनी घेतली असून त्यांना योग्यती जबाबदारी दिल्याने त्यांनी केलेल्या कामाला न्याय मिळेल असे बोलले जात आहे. त्यांना मिळालेल्या बातमी मुळे दिपाली ताई भोसले सय्यद यांच्या मित्र परिवारा मध्ये आनंदाचे अंकुर फुटळे आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा