कोकणासाठी १७०० एसटी आरक्षित

कोकणासाठी १७०० एसटी आरक्षित
ठाणे विभागातून सर्वाधिक ५६४ आणि मुंबई विभागातील विविध आगारांच्या ४६५ गाडय़ांच्या आरक्षणाला प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई : गणेशात्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत १,७००हून अधिक गाडय़ांचे आरक्षण झाले असून परतीच्या आरक्षणासाठीही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वेच्या गाडय़ांचेही आरक्षण झाल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातून येण्यासाठी जादा बसगाडय़ांची घोषणा केली. या बस ४ सप्टेंबरपासून सुटतील. या गाडय़ांचे १६ जुलैपासून जाण्याचे आणि परतीचेही आरक्षण सुरू झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे येथून कोकणासाठी सुटणाऱ्या १ हजार ७६६ गाडय़ांच्या आरक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ५७१ गाडय़ांचे समूह आरक्षण झाले आहे. ७४३ गाडय़ांचे वैयक्तिक आरक्षण झाले असून ४५२ गाडय़ांचे अंशत: आरक्षण झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. ठाणे विभागातून सर्वाधिक ५६४ आणि मुंबई विभागातील विविध आगारांच्या ४६५ गाडय़ांच्या आरक्षणाला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय कोकणातून परतीच्या गाडय़ांचेही आरक्षण होऊ लागले आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा