यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच,मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच
मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय
पुणे : करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय मंडळांच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत गुरुवारी एकमताने घेण्यात आला. दरम्यान मंडळांना परवानगी मिळविता कोणत्याही कार्यालयात फिरावे लागू नये, यासाठी मंडळांना ऑनलाइन परवाने देण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक गुरुवारी महापालिके त झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेस गटनेता आबा बागुल, आयुक्त विक्रम कु मार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, सागर पाटील यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, महापालिके चे अन्य अधिकारी उपस्थित होते. त्याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मोहोळ म्हणाले की, समाजभान जपत यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी राज्यात सर्वात आधी पुणे शहराने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही असाच निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी १०८ ठिकाणी फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यंदा ही संख्या १५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन करण्यात आले असून अमोनियम बायकाबरेनेटची खरेदीही यंदा दुपटीने के ली जाणार आहे.
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment