झोपडपट्ट्या करोनामुक्त
झोपडपट्ट्या करोनामुक्त
एकही क्षेत्र प्रतिबंधित नाही
मुंबई : मुंबईत करोना संसर्ग नियंत्रणात येत असून आता मुंबईत एकही झोपडपट्टी वा बैठी चाळ प्रतिबंधित नसल्याचे चित्र आहे. झोपडपट्ट्या व चाळी करोनामुक्त असल्याचे चित्र पालिके च्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र विविध ठिकाणच्या २२ इमारती प्रतिबंधित असून एकू ण २,८३४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर करोनाचा संसर्ग मुंबईत वाढतच गेला. सुरुवातीला रुग्ण आढळला की इमारत प्रतिबंधित के ली जात होती. मात्र नंतर झोपडपट्ट्या, चाळींमध्येही रुग्ण आढळू लागल्यानंतर हे भाग कसे प्रतिबंधित करायचे असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर उभा राहिला होता. त्याच दरम्यान गेल्या वर्षी वरळी कोळीवाड्यात रुग्ण आढळू लागल्यानंतर एप्रिलमध्ये कोळीवाडा प्रतिबंधित करण्यात आला. तेव्हा प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची ने-आण कशी करायची यावरून पालिके चा गोंधळ उडाला होता. मात्र त्यानंतर पालिके ने प्रतिबंधित इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रे अशी वेगवेगळी विभागणी सुरू के ली. प्रतिबंधित क्षेत्रांसाठीची वेगळी नियमावली तयार करण्यात आली. दुसऱ्या लाटेत झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींतच अधिक रुग्ण आढळत होते. मात्र तरीही दिवसभरातील रुग्णांमध्ये १० ते २० टक्के रुग्ण हे झोपडपट्ट्यांमधील असायचे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी होत असली तरी पूर्ण शून्यावर कधीच गेली नव्हती. पहिल्या लाटेदरम्यान मुंबईत ७०० च्यावर प्रतिबंधित क्षेत्रे होती. ती दुसऱ्या लाटेत कमी कमी होत गेली आणि सध्या मुंबईत एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.
२२ इमारती प्रतिबंधित
मुंबईत पहिल्या लाटेत वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, धारावी, वडाळा, मानखुर्द, गोवंडी, जोगेश्वरी, मालाड या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या मोठी होती. मात्र ही संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेत दिवसभरात जेवढे नवीन रुग्ण आढळत होते त्यापैकी ७० ते ८० टक्के रुग्ण हे इमारतीतील होते. आताही प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या शून्य असली तरी २२ इमारती प्रतिबंधित आहेत. तर विविध इमारतींचे १२१५ मजले प्रतिबंधित आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment