सांगलीतील पूरग्रस्त १००० मुलींचा विवाह सोहळा मुदत ठेव कार्यक्रम ९ सप्टेंबरला होणार साजरा


सांगलीतील पूरग्रस्त १००० मुलींचा  विवाह सोहळा मुदत ठेव कार्यक्रम  ९ सप्टेंबरला होणार साजरा


⭕➡️ राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची  प्रमुख उपस्थितीत

⭕➡️  १ हजार मुलींच्या लग्नासाठी ५ कोटीची तरतूद

⭕➡️  प्रत्येक मुलीच्या नावे ५० हजार ठेवणार

⭕➡️ दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम


रत्नागिरी प्रतिनिधी 

रमजान गोलंदाज

                   सामाजिक कार्यकर्ता आणि सिनेमा अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांचे सामाजिक कार्य खूप मोठा होत चालले असून पूरग्रस्तांना अनेक पद्धतीने त्यानीं  मदत केली आहे.या पूरग्रस्तांच्या पाठीशी देवा सारखा उभा राहून त्यांचे उध्वस्त कुटुंब सुरळीत करण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली मात्र तेवढ्यावरच न थांबता सांगली येथील पूर परिस्थितीमुळे कुटुंबाच्या कुटुंब उध्वस्त झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती मुळे काही मुलींचे लग्न थांबले होते.  त्या मुलींचा संसार उभा करण्याची जबाबदारी दिपाली भोसले सय्यद चारीटेबल ट्रस्ट ने घेतली असून 9 सप्टेंबर रोजी सांगली येथिल १००० मुलीच्या प्रत्येकी ५० हजार रुपये मुदत ठेव ठेवण्याचा कार्यक्रम  होणार आहे. या साठी  राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची प्रमुख उपस्थिती लागणार असून यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सांगली जिल्ह्यातील एक हजार पूरग्रस्त मुलींना  राज्यपाल  भगतसिंग कोशारी आशीर्वाद देणार आहेत.

                  दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वेगळे उपक्रम राज्यात आणि इतर देशाचे राबवले जात आहेत. अनेक लोकांना परिपूर्ण मदत करून त्यांचे कुटुंब पुन्हा उभा करण्याचे काम चारीटेबल ट्रस्ट करत आहे.त्यातच दिपाली भोसले सय्यद यांच्या संकल्पनेतून गरीब मुलींच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या नावे ५० हजार रुपये मुदत ठेव ठेवून त्यांच्या नविन संसारला मदत होणार आहे. चारीटेबल ट्रस्टच्या वतीने मोठे काम त्यांच्या हातून होणार आहे या 1000 मुलींच्या नावे  जी मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे  या उपक्रमाचे कौतुक राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले आहे  दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org